सिटी बेल | पनवेल |
कोव्हीड 19 या संकटकालीन समयी शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू अशा परिस्थितीत लीप फॉर वर्ड या उपक्रमा अंतर्गत बहुवर्ग अध्यापनाच्या उपक्रम शिक्षिका श्रीमती अर्चना नारायण गळवे यांनी स्वयंस्फूर्तीने अथक अविरत प्रयत्नातून, केंद्रप्रमुख सौ सुप्रिया म्हात्रे यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली, मुख्याध्यापिका सौ रंजीता परदेशी यांच्या अथक सहकार्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस्तव प्रभावीरीत्या उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमा अंतर्गत लिप फोर वर्ड मुंबई संचालित राज्यस्तरावरून आलेले ई-लर्निंग सर्व प्रकारीय साहित्य पालक ग्रुप वर फॉरवर्ड करण्यात येत होते. तथापि जिथे ऑनलाईन कार्य करण्यात अडचणी येत होत्या तिथे प्रत्येक घरोघरी जाऊन या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी सेमीफायनल पर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण बदल झाल्याचे दिसून आले.
लीप फॉर वर्ड सनियंत्रणांकडून वर्षभरातील उद्देशांकित दिलेल्या कार्याच्या प्रतिसादात्मक मूल्यमापनाच्या आधारे, उत्कृष्ट कामगिरी पाहून महाराष्ट्र राज्यातून 44 शिक्षकांची बेस्ट टीचर म्हणून निवड करण्यात आली.
त्यापैकी अर्चना ना गळवे जि. प. शाळा कुडावे, केंद्र शिरढोण यांची राज्यस्तरीय बेस्ट टीचर करिता करण्यात आली आहे.
त्याबद्दल ट्रॉफी व सन्मानपत्र पोस्टाने घरपोच पाठवून बेस्ट टीचर अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.








Be First to Comment