Press "Enter" to skip to content

रोहयात पावसाची संततधार, शेतीची कामे पूर्णत्वास

सिटी बेल | कोलाड | शरद जाधव |

या वर्षी पावसाने जुन महिन्यातच तुफान फटकेबाजी केल्याने समाधान कारक पाऊस पडत होता. मात्र मधेच पाऊस गायब झाला होता बळीराजा चिंतेत असताना गेली काही दिवस पावसा ने सुरवात केल्याने शेतकरी शेतीच्या कामात मग्न झाला आहे व अनेक ठिकानी लावणीची कामे पूर्णतवास आल्याचे दिसते.

रोहा तालुक्यात भातशेती चे पिक खुप मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. सध्या शेतीक्षेत्र कमी झाले असले तरी कोरोना काळात लोकांचा रोजगार बुडला असल्याने गेली दोन वर्ष अनेकांचा शेतीकडे कल दिसून आला आहे. तर पारंपारीक भात पिका सोबत भाजी पाल्याची लागवड सुधा शेतकरी करित आहे.

या वर्षी पावसाने चांगली सुरवात केली. त्यामुळे पेरणी वेळेवर झाली लावणीला सुरवात झाल्यानंतर पाऊस गायब झाला होता. परंतु पावसाने संततधार सुरवात केल्याने बळीराजा सुखावला असुन शेतीची कामे उरकण्यात मग्न आहे. महागाई व मजुरी वाढल्याने शेती परवडत नाही अशी बोंब शेतकरी मारीत असला तरी भाताला हमी भाव मिळाला तर शेतकरी शेतीकडे वलु लागेल वर्ष भर राबराब राबणारा शेतकरी ज्यावेळी भात विकण्या करिता व्यापारी वर्गाकडे जातो त्या वेळी कवडी मोल भावाने भात विकत घेतला जातो त्या वेळी शेतकरी राजाच्या पदरी निराशा येते तर हमी भाव केंद्र बेभरवश्यचे झाले आहेत पैसे वेळेवर मिळत नाही त्यांमुळे सर्व बाजुने शेतकरी अडचणीत आहे शासनाने शेतकरी वर्गाकरिता विविध शासकीय योजना राबवण्यात याव्यात जेणेकरुन बळीराजा जगेल कारण तो जगाचा पोशिन्दा आहे. उत्तर प्रदेश सरकार शेतकरी वर्गा करिता 72 तासात हमी भाव केंद्रा वर पैसे देतात आणि मात्र महारास्ट्रा त या गोस्टी होत नाहित. त्यामुळेच शेतकरी शेतिकडे न वलता शेती विकण्या च्या मागे लागल्याचे धक्कादायक चीत्र दिसुन येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.