सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण नगरपालिकेतील करवसुली विभागातील लिपिक पदावर कार्यरत असणारे नरेंद्र उभारे यांनी कोरोना काळात केलेल्या कामांची दखल घेऊन उरण नगरपालिकेने त्यांना कोरोना योद्धा घोषित केले आहे. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
नपा कर्मचारी नरेंद्र उभारे यांनी २३ मार्च २०२० पासून ते आजतागायत कोरोनाच्या महामारी संकटात आपल्या जीवाची बाजी लावत अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर होते. त्यांच्या या कार्याची दखल उरण नगरपालिकेने घेत त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित केले.
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नरेंद्र उभारे यांना कोरोना योद्धाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक रवी भोईर आदी उपस्थित होते. कोरोना योद्धाने गौरविण्यात आलेल्या नरेंद्र उभारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








Be First to Comment