सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
आषाढी वारी निमित्ताने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने काही ठराविक वारकरी व ठराविक पाळख्या एसटी बसने पंढरपूर जाण्याचा निर्णय घेतला व अनेक वारकरी वर्गाची निराशा झाली परंतु तरी ही वरसगाव येथे वारकरी वर्गाच्या चेहऱ्यावरील वारीचा भाव कोठे कमी झालेला दिसुन आला नाही.
पंढरपूर येथे न जाता आल्याने वरसगाव येथील वारकरी निराश न होता गावातच वारीचा आनंद साजरा केला यानिमित्ताने पहाटे ४ वा. काकड आरती, सकाळी १० वा पारायण वाचन,दुपारी ३.०० वा. दिंडी सोहळा,संध्याकाळी ६ते ७ हरिपाठ राजेंद्र म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली तर रात्री ७ ते ९ ह.भ.प. अनिल महाराज सानप यांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली
यावेळी विजय सानप राजेंद्र म्हसकर, अक्षय ओव्हाळ,गणेश कुर्ले, आकाश राजिवले. अभिजित सानप,विशाल ढोकरे,मोहन सानप किसन ढोकरे,दगडू म्हसकर, आंब्रूस्कर बाबा,अशोक राजीवले विठोबा ढोकरे, व महिला वर्ग उपस्थित होत्या सर्व कार्यक्रम सोशल डिस्टन्सचा पालन करत मोठ्या वातावरणात साजरा करण्यात आला.
Be First to Comment