रात्र
त्या कोवळ्या कळीला फुलवून रात्र गेली
थेंबात त्या दवाच्या न्हाऊन रात्र गेली
रानातल्या फुलांनी गंधीत मीच झालो
मौजेत कोणत्या मज मोहून रात्र गेली
कैफात धूंद झालो आवेग कोणता हा
कोषात राहुनी का फसवून रात्र गेली
तेजास काय ठावे ते रूप यामिनीचे
रंगास रागिणीच्या तरसून रात्र गेली
हे वागणे अचानक परकेच जाहले का
माझ्यातल्या मला ही हरवून रात्र गेली
काहीच बोललोना उरलो न मी जराही
पाहून वेदना ह्या बरसून रात्र गेली
सुमिता एस. सबनीस
ता,सेलू जि.परभणी







Be First to Comment