Press "Enter" to skip to content

डेक्कन जिमखाना दत्त मंदिरात परंपरे प्रमाणे पांडुरंगाची पूजा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

आषाढ एकादशीचे औचित्य साधत दत्त मंदिरात मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत प्रथेप्रमाणे पांडुरंगाची पूजा करण्यात आली, यावेळी भजन सम्राट प्रसाद बुवा पाटील यांनी विठ्ठलावर आधारित भजन म्हणून उपस्थितांची वावा मिळवली.

पूजे समयी सर्वश्री प्रसादबुवा पाटील, राजन भोळे, दिलीप आंबवणे, महेंद्र चंदन, तानाजी वांजळे, रमाकांत ठोंबरे, कौशिक वांजळे, निलराज विचारे, सुनील आंबवणे, उपस्थित होते, पूजा आरती आणि सायंकाळी प्रसादबुवा पाटील यांचे सुश्राव्य भजनाला कौशिक वांजळे यांनी पाखवाज वर साथ केली तर अक्षय उंदेरकर यांनी तबला साथ दिली, कोरसला तानाजी वांजळे, दिलीप आंबवणे, सुनील आंबवणे, निलराज विचारे, प्रसन्न पाटील आणि रमाकांत ठोंबरे यांनी साथ दिली.

यावेळी शासनाने आखून दिलेल्या कोरोणा नियमाचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.