सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर) व द.ग.तटकरे ज्युनिअर काँलेजने आपल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखत विद्यालयाचा एकूण निकाल १०० % इतका लागला आहे.
या विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल गेली अनेक वर्षे अतिशय चांगला लागत असून या शैक्षणिक वर्षीही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयात प्रथम क्र.पुर्वा ज्ञानेश्वर देशमुख ९१८० %,द्वितीय क्र.कौशल राजेश शिंदे ०९•४०%तुतीय क्र.,प्रतिक किशोर देशमुख ८९•२०%,चतुर्थ क्र.सम्यक चंद्रशेखर कांबळे ८७•६०%,तर पंचम क.तनिष मारूती धामणसे८६•६०% यांनी पटकावले आहेत.
विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या सुयशाबद्दल संस्थापक-अध्यक्ष श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर),चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष राम कापसे,सचिव धोंडू कचरे,शा.व्य. समिती चेअरमन प्रकाश थिटे,शाळा समिती चेअरमन बाळाराम धामणसे, मुख्याध्यापक सुरेश जंगम व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या आहेत.







Be First to Comment