सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्यातील नीव सोशियल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या होली एंजल स्कूलचे सर्वच्या सर्व ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यामध्ये कुमार रोहित राजेंद्र खरीवले (९५.२० %) हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर कुमारी आमिना साबिलअहमद खान (९२.८०%) व कु. सोहम शैलेश पिसाट (९१.०० %) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कुमारी दिया महेश पवार (९०.८० %) आणि कु. अद्वैत मंदार सिनकर (९०.६०) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळविला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सीमा मुल्कवाड व मुख्याध्यापक विजय मुल्कवाड, उपमुख्याध्यापक मुकेश मिसळ, शाळेच्या हेड मिस्ट्रेस निलिमा राणे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.








Be First to Comment