सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एक लाख झाडांची लागवड करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आप आपल्या गावच्या हद्दीत वृक्षारोपण केले.
आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाने या शुभ कार्याची सुरुवात विद्यापीठाच्या वर्धापन दिनी केली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे विद्यापीठाचे कुलगुरू मा. सुहास पेडणेकर यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे. महाविद्यालयातील १५० पेक्षा जास्त विद्यार्थी या वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदवला. हा उपक्रम ३१ जुलै २०२१ पर्यंत चालू राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थी या कोरोना मारामारीच्या नियमाचे पालन करीत हे स्तुत्य उपक्रम राबवीत असल्याने या अभिमानास्पद कामगिरी बद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवायोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. विकास शिंदे डॉ. पी एन. ज्योथी यांचे सहकार्य विद्यार्थ्यांना मिळाले.








Be First to Comment