Press "Enter" to skip to content

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.विकास शिंदे यांना पी.एचडी पदवी

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

कोकण एज्यकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक विकास शंकर शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे जि. रायगड येथून पी. एचडी. (डॉक्टरेट) पदवी संपादन केली आहे.

प्रा. विकास शिंदे यांनी “स्टडी ऑफ स्ट्रक्चरल ॲन्ड मॅगनेटिक प्रॉपर्टीज ऑफ ॲल्युमिनियम, लॅथॅनम ॲन्ड निकेल सबस्टुटीटेड एम- टाईप कॅल्शियम नॅनो हेक्झाफेराईट” या विषयावर संशोधनपर प्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील मार्गदर्शक डॉ. संगिता दाहोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. तसेच त्यांना सहाय्यक मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर एल. एन. सिंग यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

प्रा. विकास शिंदे हे २०१० पासून को.ए. सो. च्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे पाच संशोधनपर लेख विविध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा आणि चर्चासभांमध्ये सहभाग घेतला आहे.

प्रा. विकास शिंदे यांच्या या यशाबद्दल को. ए. सो. चे अध्यक्ष संजय दत्ता पाटील, सचिव अजित शाह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. दिनेश भगत, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य नरेंद्रशेठ जैन, अनिलशेठ काळे, अॅड. सोनल जैन आदींसह सर्व प्राध्यापक, प्राध्यापेकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.