सिटी बेल | पेण | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुधारित मूल्यमापन कार्यपद्धती नुसार दहावीच्या शालांत परीक्षेत पेणच्या श्रीमती सुमतीबाई वि.देव या सेमी इंग्लिश माध्यम व पीएसएमएस इंग्लिश मिडीयम या विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील कु.सई संदीप पाटील हिला 98.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे तर कु. तनिशा पंढरीनाथ म्हात्रे हिला 97.40 टक्के गुण मिळाले असून तीने द्वितीय क्रमांक मिळविला तर तृतीय क्रमांक मनीष उमेश पाटील याला 97.20 टक्के गुण मिळाले आहेत.
जवळपास या शाळेतील 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या वर गुण पटकावले आहेत तर पीएसएमएस इंग्लिश मिडीयमच्या श्रेयस अविनाश देशपांडे यांनी 98.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे द्वितीय क्रमांक विनी नविन पाटील हिने 97.20 टक्के आणि तृतीय क्रमांक शर्वरी शिवाजी खामकर हिने 96.80 टक्के गुण मिळविले आहे यासह 10 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या आसपास गुण मिळविले आहेत.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पेण शिक्षण महिला समितीच्या अध्यक्षा सुहासिनी देव यांच्यासह शाळेतील दोन्ही मुख्याध्यापिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.







Be First to Comment