सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |
आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे औचित्य साधत मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर तथा मा. न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, उरण येथे उरण विधी सेवा समिती आणि उरण तालुका बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यांत आले.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी मा. उरण न्यायालयाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश एन.एम. वाली, सह दिवाणी न्यायाधीष आर. बी. पोळ आणि दुसरे सह दिवाणी
न्यायाधीश पी. एन. पठाडे मॅडम, जेष्ठ विधीज्ञ अॅड. राजेंद्र भानुषाली, उपाध्यक्ष
अॅड. सागर कडू, सचिव अॅड. किशोर ठाकूर, सहा. सरकारी अधिवक्ता अॅड. अंकुश कदम, अॅड. वसुदा खामकर, अॅड. योगेश म्हात्रे, अॅड. सागर मोकल, अॅड. दिक्षीता भगत, अॅड. अमर पाटील, अॅड. विपुल ठाकूर, अॅड. गोविंदा घरत, अॅड. धीरज डाकी, अॅड. जितेंद्र कातरणे, अॅड.प्रतिभा भालेराव, अॅड. नासीर शेख, अॅड. निग्रेश पाटील, अॅड. केवल गावंड, अॅड. गीत पाटील, अॅड. प्राची जोशी, अॅड. वृषाली पाटील, अॅड. जिवीका डाकी, अॅड. स्वाती नांदगावकर, अॅड. कैलास म्हात्रे, उरण न्यायालयाचे सहा. अधिक्षक आनंद फडके , सहा. पोलीस निरीक्षक श्री. गवते, सहा. पोलीस निरीक्षक श्री. कावळे, अमोल जाधाव, प्रमोद पाटील, नरेंद्र पाटील उपस्थीत होते.
मा. उरण न्यायालयाच्या परीसरांत वरील मान्यावरांनी विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे यांसह सध्याच्या काळातील ऑक्सीजनची आवश्यकता लक्षांत घेवून तुलशीच्या झाडांचे देखील वृक्षारोपण केले.







Be First to Comment