Press "Enter" to skip to content

एएके कमानीच्या वतीने अलिबाग सिव्हील हॉस्पिटलला व्हेंटिलेटर्स दान

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

एएके कमानी हा देशातील तेल आणि मेदवर्गीय उत्पादन निर्मितीमधील अग्रगण्य नाव असून त्यांनी महाराष्ट्रातील अलिबाग सिव्हील हॉस्पिटल (जिल्हा रुग्णालय, अलिबाग) ला 2 व्हेंटीलेटर दान केले. हे दोन व्हेंटिलेटर रूग्णालयाच्या बाल विभागात कार्यरत होणार आहे.

एएके कमानी सीएसआर अंतर्गत प्रगती या ‘मेकिंग बेटर कम्युनिटीज हॅपन’ सेवाभावी उपक्रमाद्वारे हे दान करण्यात आले. देशात कोविड-19 ने थैमान घातले असताना आपतकालीन स्थितीत जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेला बळकट करण्याच्या उद्देशाने हे दान करण्यात आले.

या प्रसंगी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि एएके ग्रुप- इंडिया रिजन, अध्यक्ष धीरज तलरेजा आदी उपस्थित होते.

स्टेन इस्ट्रप, अध्यक्ष आशिया, एएके यांनी सांगितले: “आम्ही हे सगळं मेकिंग बेटर हॅपन’ साठी करत आहोत. भारताने मोठ्या जिद्दीने कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला केला आणि आमच्या सभोवती असलेल्या समाजाला पाठबळ देण्याच्या दिशेने बालक विभागाला दान करण्यात आलेले दोन व्हेंटीलेटर हा आम्ही उचललेला खारीचा वाटा आहे. उत्तम समाजाच्या निर्मिती उद्दिष्टांकरिता आम्ही वचनबद्ध आहोत.

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, “कोविड-19 स्थितीने आपल्या जीवनावर विपरीत परिणाम निर्माण केला आहे, प्रामुख्याने गरीब आणि गरजूंना फटका बसला. एएकेसारख्या संघटनांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी वैद्यकीय मदत करणे काळाची गरज आहे. आम्हाला व्हेंटीलेटरचे दान करून रुग्णालयाला कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज केल्याबद्दल आम्ही एएके ‘चे आभार मानले.

एएके- इंडिया, अध्यक्ष धीरज तलरेजा म्हणाले की, या महासाथीने तातडीने सुधारित आरोग्य सुविधेची गरज निर्माण केली आहे, विशेषत: लहान जिल्हे आणि शहरे. अशा कसोटीच्या प्रसंगी समाजाला पाठबळ देण्यासाठी आम्ही एएके मध्ये वचनबद्ध आहोत. म्हणूनच आम्ही अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथील बाल विभागाला व्हेंटिलेटरचे दान देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले.

एएके प्रगती हा एएके कमानी सीएसआर उपक्रम असून पर्यावरण आणि समाजावर सकारात्मक परिणाम निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे. एएके प्रगतीचे लक्ष्य महिला आणि बालक सबलीकरण कार्यक्रम, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण आणि अन्य यासंबधी निगडीत आहे. जल शुद्धीकरण आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या स्वच्छता प्रकल्पांसोबत जीवनाचा दर्जा सुधारण्याचा देखील प्रयत्न आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.