सिटी बेल | पनवेल | राकेश खराडे |
शाळांमधून मुलांना शिक्षण देऊन सुशिक्षित केले जाते. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात १०वी- १२वी नंतर पुढे काय ? हा प्रश्न मुलांना- पालकांना भेडसावत आहे. शालेय शिक्षणासोबतच मुलांना नोकरी किंवा व्यवसाय करण्या इतपत स्वयंपूर्ण होता यावे. या उद्दात हेतूने,अरिना ॲनिमेशन या संस्थेतून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल ज्ञान देऊन स्वतःच्या पायावर सक्षम करण्याचे ठरविले आणि ते सक्षमतेने पूर्ण केले.
अरिना ॲनिमेशन पनवेलमधील एक विख्यात शैक्षणिक संस्था गेली १० वर्ष अजय अंकुश पाटील यांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित आहे. आपल्या गावाकडच्या मुलांना विकासाच्या वाटेवर आणण्याचे आपले स्वप्न चिपले गावच्या या सुपुत्राने अरिना ॲनिमेशनच्या रुपात साकार केले. मुलांनीही या शिक्षणातील फायदे लक्षात घेऊन त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
‘अरिना ॲनिमेशन पनवेल’ मध्ये मुलांना ग्राफिक्स, गेमिंग, फोटोग्राफी, वेब डिझायनिंग, फिल्म मेकिंग, ॲनिमेशन आणि व्हिडिओ एडिटिंग या विषयांतील प्रशिक्षण दिले जाते. येथे शिकून आज कित्येक मुलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. आपल्या संस्थेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत, बदलत्या काळानुसार अद्ययावत शिक्षण व शिक्षणसामुग्रीचा उपयोग करून अजय सरांच्या अरिना ॲनिमेशनने या क्षेत्रातील अनेक पारितोषिके जिंकली आहेत. उत्कृष्ट शिक्षकवृंद, नवोदित शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांच्या विकासाची आस यामुळे येथील विद्यार्थ्यांना संस्थेविषयी आपुलकी आहे.
अरिना ॲनिमेशन क्षेत्राबद्दल माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवून आपल्या समाजाला प्रगतीच्या झोतात आणण्याच्या उद्दात हेतूने दरवर्षी हया संस्थेतर्फे उपक्रम सादर केले जातात. यावर्षी उपक्रमाअंतर्गत ॲनिमेशन क्षेत्राबद्दल विस्तृत माहिती सादर केली जाणार असून, ग्राफिक्स, गेमिंग, फोटोग्राफी, वेब डिझायनिंग, फिल्म मेकिंग, ॲनिमेशन, आणि व्हिडिओ एडिटिंग इत्यादी क्षेत्राविषयी माहिती दिनांक १७ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१ या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत माहिती दिली जाणार आहे.
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी हा उपक्रम विनामूल्य राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी अरिना ॲनिमेशन मो.828654090 येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








Be First to Comment