Press "Enter" to skip to content

शिवसंपर्क अभियान अंतर्गत केगाव व चाणजे पंचायत समिती गणाच्या सभा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने, रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका शिवसंपर्क अभियाना अंतर्गत चाणजे जिल्हा परिषदेच्या केगाव व चाणजे पंचायत गण विभागाच्या सभा म्हातवली व करंजा येथे संपन्न झाल्या.

सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी पक्षप्रमुख यांना अभिप्रेत असलेल्या शिवसंपर्क अभियानाची माहिती दिली. शाखाप्रमुख व शिवसैनिकांनी आपल्या गावात आधारकार्ड, रेशन,रिक्षा चालकांचे रजिशट्रेशन, सरकारी योजनांची अमंलबजावणी याविषयी प्रभावीपणे कामे करावी असे सांगितले .

गाव तेथे शिवसेना शाखा व घर तेथे शिवसैनिक ही शिवसंपर्क अभियानात मोहीम राबवून संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले. या वेळी उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक अमित भगत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

या मीटिंग साठी केगाव विभागप्रमुख एस के पुरो, चाणजे विभागप्रमुख हरेश्वर म्हात्रे, उपविभागप्रमुख रवी पाटील, चाणजे सरपंच मंगेश थळी तसेच दोन्ही विभागांतील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, आजी- माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक, उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.