सिटी बेल | श्रीनिवास काजरेकर |
नवीन पनवेल |
१६० हून अधिक वर्षांची परंपरा असणारी संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल, इंग्रजी माध्यम, प्राथमिक विभागाने ऑनलाईन आषाढी एकादशी साजरी केली.
विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सहभागी होऊन या उत्सवाची शोभा वाढवली. विठ्ठलाची पूजा व आरती करून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. विविध संतांची माहिती तसेच आषाढी एकादशी का व केव्हा साजरी करावी याबद्दल माहिती सांगण्यात आली. याप्रसंगी वारीमध्ये गेली अनेक वर्ष प्रत्यक्ष सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले.
अभंग, नृत्य तसेच भक्तीपर गीते विद्यार्थ्यांकडून याप्रसंगी सादर करण्यात आली.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शीतल साळुंखे यांच्या मार्गदर्शना खाली हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वांना आरोग्यपूर्ण व समृद्ध आयुष्य मिळावे यासाठी कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने करण्यात आली.








Be First to Comment