डोंगरी ग्रामपंचायती मार्फत व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना निवेदन
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील डोंगरी फुंडे पाणजे या तीन गावांना जोडणारा पूल 5 महिन्यांपूर्वी कोसळला होता. दुर्दैवाने उरण मधील एकाचा यात मृत्यू झाला होता. डोंगरी, फुंडे, पाणजे या तिन्ही गावांना सर्वात जवळचा मार्ग म्हणून नागरिकांची या पुलावरून ये-जा सुरु होती. मात्र पुलच कोसळल्याने या तिन्ही गावातील नागरिकांचा संपर्क तुटला असून दैनंदिन प्रवास करनेही त्रासदायक ठरत आहे.
नागरिकांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करून आपले गाव गाठावे लागत आहे. त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही जास्त प्रमाणात खर्च होत आहे. वेळ व पैशाची बचत व्हावी, नागरिकांचा त्रास वाचावा यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर त्वरित नवीन पूल बांधावा व नवीन पूल तयार होईपर्यंत तिथेच बाजूला पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी अशी मागणी डोंगरी ग्रामपंचायती मार्फत व्यवस्थापकीय संचालक सिडको -बेलापूर, मुख्य कार्यकारी अभियंता सिडको- बेलापूर,कार्यकारी अभियंता सिडको कार्यालय उरण येथे निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी कामगार नेते महादेव घरत, डोंगरी ग्रामपंचायतचे सरपंच -निलेश घरत, डोंगरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच-किरण घरत आदी मान्यवरांनी सिडको कार्यालय उरण येथील कार्यकारी अभियंता श्री. मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. व सदर महत्वाची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.








Be First to Comment