Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांना सँनेटायझर व अँक्सिमिटरचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या संस्थेचे श्रमिक विद्यालय चिल्हे या विद्यालयास अँक्सिमिटर व विद्यार्थी वर्गाला सँनेटायझर वाटपाचा कार्यक्रम आज (दि.१५) संपन्न करण्यात आला.

देवकान्हे ग्रा. पंचायतीचे सरपंच तथा रायगड जिल्ह्याचे लोकशाहीर रायगड भूषण वसंत भोईर,ग्रा. पं.सदस्य दयाराम भोईर तसेच युवा कार्यकर्ते मंगेश ठाकूर यांच्या वतीने सदर अँक्सिमिटर व सँनेटायझरचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी मुख्याध्यापक दिपक जगताप, सहा.शिक्षक नरेंद्र माळी,आर.के.म्हात्रे, महेंद्र जवरत,संजय आंधळे,अमोगसिद्ध सुरवसे,अनुराधा मोरे,ज्योत्स्ना सबरदंडे,रामदास नवघरे, चंद्रशेखर कांबळे,रेश्मा शिंदे आदी उपस्थित होते.सध्या जगभर कोरोना महामारीचे थैमान सुरू असून कोरोना काळात विद्यार्थी वर्गाच्या सुरक्षिततेच्या द्रुष्टीने सदर वस्तूंचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगतानाच विद्यार्थी वर्गाने आयुष्यात खुप शिक्षण घेऊन मोठे होऊन स्वतः बरोबरच आई-वडील व समाजाचे नावलौकिक करावे अशाप्रकारचे मार्गदर्शन यावेळी सरपंच तथा लोकशाहिर वसंत भोईर यांनी विद्यार्थी वर्गाला केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.