सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष कैलास भोईर यांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त डाउर नगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुलांना मास्क, कंपास, वह्या .वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून तटकरेंच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील. उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत, .उरण तालुका विधान सभा अध्यक्षा सौ.भावना घाणेकर.जिल्हा उपाध्यक्ष एड. भार्गव पाटील, जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, महिला तालुका अध्यक्ष सौ. हेमांगीताई पाटील आणि समाधान म्हात्रे आदी सह विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.








Be First to Comment