सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गवासी रमेशशेठ डाऊर यांच्या १२ व्या स्मृतिदिना निमित्त आदिवासी बांधवांना अन्नधान्य व मास्कचे वाटप करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशशेठ डाऊर यांच्या कार्याची माहिती तालुक्यातील अनेकांना आहे. त्यांनी येथील जनतेच्या समस्यां मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. आज त्यांची उणीव सर्वांना विशेषता करंजा ग्रामस्थांना जाणवत आहे.

आज त्यांना जाऊन १२ वर्षे झाली त्यानिमित्ताने डाऊर कुटूंबियांतर्फे करंजा आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांना अन्नधान्य व मास्कचे वाटप करण्यात आले. अन्नधान्यमध्ये तांदूळ, तेल, मसाला, हळद, डाळ, साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अन्नधान्य व मास्कचे वाटप रमेशशेठ डाऊर यांचे चिरंजीव सचिन डाऊर, नातू युग डाऊर, आतिश थळी, मंदार थळी, भावना गायकर, अमृत थळी आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले.








Be First to Comment