इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे
|
आमदार नानाभाऊ पटोले- अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सुचनेनुसार उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटी व सर्व सेल च्या वतीने आज केंद्रातील भाजपा सरकारचा पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात निषेध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सायकल रॅली उरण शहर काँग्रेस कार्यालय येथुन पेट्रोल पंप कोटनाका येथपर्यंत काढण्यात आली. सदर निषेध रॅली इंटकचे राष्ट्रीय सचिव, काँग्रेस नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. यावेळी काळे कपडे परिधान करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.तसेच मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या .
या रॅलीत मिलिंद पाडगावकर -जिल्हा उपाध्यक्ष,उमेश भोईर -ओबीसी महाराष्ट्र सरचिटणीस, मार्तंड नाखवा-कोकण अध्यक्ष फिशरमन काँग्रेस,किरीट पाटील-अध्यक्ष उरण शहर काँग्रेस कमिटी,प्रकाश पाटील -शहर उपाध्यक्ष,रेखा घरत-अध्यक्षा उरण तालुका महिला काँग्रेस कमिटी,अफशा मुकरी-अध्यक्षा उरण शहर महिला काँग्रेस कमिटी,अब्दुल शिलोत्री-अध्यक्ष उरण शहर युवक काँग्रेस कमिटी, रोहित घरत-उरण विधानसभा अध्यक्ष, दिपक ठाकूर, श्रेयश घरत व सर्व सेल पदाधिकारी उपस्थित होते.
प्रचंड प्रमाणात डिझेल, पेट्रोल, गॅसच्या दरात वाढ झालेली आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. अगोदरच जनतेला रोजगार उपलब्ध नाही.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.त्यात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे.सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. जनतेला दिलासा देण्याऐवजी जनतेवर हुकूमशाही चालली आहे. या हुकूमशाहीचा,पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध केला आहे.
- महेंद्र घरत, कामगार नेते










Be First to Comment