Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद २१ ऍक्टिव्ह रुग्ण,१४१३ जणांची कोरोनावर मात

रुग्ण संख्येचा आलेख खालावला असला तरी नागरिकांनी गाफिल न राहण्याचे आवाहन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वासांबे मोहोपाडा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख जून अखेरपासून खालावला आहे.सध्या वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात १३ जुलैपर्यंत नऊ दिवसांच्या कालावधीत एकूण २१ रुग्ण ऍक्टिव्ह असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५२६ झाली आहे.यात कोरोनावर १४१३ जणांनी मात केली आहे.तर वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील एकूण ६२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली.तशीच दुसऱ्या लाटेतही दिसून आली. परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन शासनाच्यावतीने होत आहे.

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची १३ जुलैपर्यंत असलेली गावनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे

मोहोपाडा — कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह संख्या- ०४
रिस परिसर – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – ०४
नविन पोसरी – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या -०२
चांभार्लीं – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या -०१
शिवनगर – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या -०२
आली आंबिवली – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या -०१
लोधिवली परिसर – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या -०४
पानशिल – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या-०
तळेगाव – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या -०
रिसवाडी – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ०
तळेगाव वाडी – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ०
पराडे – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ०
खाने आंबिवली – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ०१
भटवाडी/कालणवाडी – कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ०१
कांबे – ०१

दरम्यान खालापूर तालुका क्यातील ८८५५ रुग्ण संख्या आहे.तर १३ जूलैपर्यंत चौक मंडलात एकूण २५४४ रुग्ण संख्या असून एकूण ८९ जण मयत झाले आहेत.नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात कोरोनाची संख्या कमी झाल्याने नागरिकांनी गाफिल राहू नये.

शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरण सुरु केले असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत,सोशल डिस्टिंक्शन पालावे,मास्कचा वापर करावा असे आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.