सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
देशातील पहिल्या क्रमांकाची कामगार संघटना म्हणून इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. (INTUC) ला ओळखली जात आहे. अशा संघटनेचे राष्ट्रीय सचिव असलेले आणि महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते इंटकच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या प्रदान केल्या.
एकाच दिवशी पाताळगंगा(रसायनी ), खोपोली येथे तीन युनिटचे उदघाट्न करण्यात आले. तसेच आणखी कंपन्यांचे युनिट उदघाट्नाच्या प्रतीक्षेत आहेत. एवढ्या प्रचंड वेगाने महेंद्रशेठ घरत आणि त्यांची NMGKS ची संपूर्ण टीम सामाज्यात काम करताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात इंटकचे काम महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष किरिट पाटील, कार्याध्यक्ष, पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील यांच्या अथक परिश्रमातून रायगड जिल्ह्यात जोमाने काम करत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील ऑफिसमध्ये इंटकच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवड करून त्यांना नियुक्ती पत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.या कार्यक्रमासाठी. राष्ट्रीय इंटकचे सचिव व महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष. कामगारनेते महेंद्रशेठ घरत, रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा. ऍड.सौ श्रद्धाताई ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा. सौ. रेखाताई घरत, अखलाक शिलोत्री, मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरिट पाटील, संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उरण तालुका इंटकचे अध्यक्ष संजय ठाकूर, पनवेल तालुका इंटकचे अध्यक्ष दीपक ठाकूर, रायगड जिल्हा युवक इंटकचे अध्यक्ष रोहित घरत.यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या मध्ये जितीन अनंत गोंधळी यांची रायगड जिल्हा इंटकच्या उपाध्यक्षपदी, अजित वासुदेव ठाकूर यांची रायगड जिल्हा युवक इंटकच्या सरचिटणीसपदी, पंकज प्रकाश चवरकर यांची अलिबाग तालुका इंटकच्या अध्यक्षपदी, भालचंद्र पाटील, अमोल पंढरीनाथ म्हात्रे यांची उरण तालुका इंटकच्या उपाध्यक्षपदी, योगेश तुकाराम रसाळ यांची पनवेल तालुका इंटकच्या सरचिटणीस पदी, प्रांजल भोईर यांची उरण तालुका इंटकच्या सरचिटणीसपदी, वैभव शंकर घरत, विपुल धोंडू पाटील यांची उरण तालुका इंटक चिटणीसपदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी महेंद्र घरत यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र युथ इंटकचे उपाध्यक्ष लंकेश ठाकूर,उरण तालुका युवक इंटक चे अध्यक्ष राजेंद्र भगत, गोपीनाथ मांडेलकर, पद्माकर घरत,जासई विभाग काँग्रेस अध्यक्ष विनोद पाटील, प्रेमनाथ ठाकूर, अमोल ठाकूर,मनोज घरत,रायगड जिल्हा इंटकचे सरचिटणीस.विवेक म्हात्रे,उरण तालुका युवा इंटकचे सरचिटणीस. आदित्य घरतआदी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment