Press "Enter" to skip to content

डेल्टा व्हेरीएंट म्हणजे नक्की काय ? पहा ही विशेष मुलाखत

तिसरी लाट थोपविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय सज्ज : डॉ सचिन संकपाळ

सिटी बेल | पनवेल |

येणार येणार म्हणता कोरोना विषाणूची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात आणि केरळ राज्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरीएंट सक्रिय झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

डेल्टा व्हेरीएंट म्हणजे नक्की काय आणि त्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याबाबत आमच्या प्रतिनिधीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन संकपाळ यांच्यासोबत डेल्टा व्हेरीएंट बाबत चर्चा केली.

डॉ सचिन संकपाळ म्हणाले की,डेल्टा व्हेरीएंट हे सार्स कोव्ह 19 या मूळ कोरोना विषाणू चे बदललेले रूप आहे. प्रत्येक लाट म्हणजे या विषाणूने स्वतःच्या संरचनेत केलेला बदल होय, ज्याला वैद्यकीय भाषेत म्युटेशन असे म्हणतात. कोरोना विषाणूची तिसरी लाट पहिल्या दोन विषाणू प्रवर्गा पेक्षा अधिक घातक असेल.डेल्टा व्हेरीएंट अधिक वेगाने प्रसार पावणारा आणि अधिक सक्षम स्वरूपाचा विषाणू आहे. पहिल्या दोन लाटांनी मध्ये आढळून येणारी लक्षणे या लाटेत सुद्धा आढळतील परंतु त्यांचे स्वरूप अधिक तीव्र स्वरूपाचे असेल. या लाटेमध्ये लहान मुलांना संक्रमण होण्याचा धोका अधिक असेल.

डॉ सचिन पुढे म्हणाले की, संक्रमण झाल्यानंतर तब्येत अत्यवस्थ होण्यास पहिल्या लाटेत साधारण आठ दिवस लागायचे, दुसऱ्या लाटेत संक्रमणनंतर अत्यवस्थ होण्याकरता रुग्णास पाच ते सहा दिवस लागायचे. या लाटेत मात्र संक्रमण झाल्यानंतर अधिक वेगाने रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण दिसून येते. पहिल्या दोन लाटेत आपण ज्या पद्धतीने काळजी घेतली तशीच काळजी या लाटे च्या वेळेस सुद्धा घ्यायची आहे. नाक व तोंड झाकेल या पद्धतीने मास्क लावणे अनिवार्य आहे. एखाद्या व्यक्तीचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले असले तरी देखील त्यांनी मास्क लावलाच पाहिजे. सातत्याने हात धुवत राहणे गरजेचे आहे, साबण उपलब्ध नसल्यास निर्जंतुकीकरण करणारे द्रव्य वापरावी. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सामाजिक अंतर राखणे! एका अहवालाच्या निष्कर्षानुसार दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांपेक्षा जास्त अंतर असेल तर विषाणू संक्रमणाची शक्यता जवळपास नष्ट होते. त्यामुळे गर्दी न करता सामाजिक अंतर राखणे हे विषाणू ची लाट थोपविण्याकरता अत्यंत महत्त्वाचे शस्त्र आहे.

डॉक्टर सचिन संकपाळ म्हणाले की ऑक्सिजन आणि रेमडेसिविर सारखी अँटीव्हायरस इंजेक्शन यांचा मुबलक साठा आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे. आमच्या रूग्णालयातील 150 बेड्स तिसऱ्या लाटेतील संक्रमित रुग्णांची सेवा करण्यासाठी अद्ययावत उपकरणांच्या सह सज्ज आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.