Press "Enter" to skip to content

पानगळती

पानगळती

ओसाड रूक्ष माळरानावर
ऊभा वृक्ष निराकार

पानगळतीचा येता मोसम
पानाविनाच ऊभा एकलाच
आयुष्याच्या उतरणीवर….
सोबत नसता साथीदार….
मन होउनी जाई उदासीन….
जीवन वाटे निरर्थक निराधार…

परी चैत्र मास येता परतुनी
वृक्षास येई पालवी बहरूनी
कोमल हिरव्या नव पर्णाची
पक्षांचाही कलरव येई कानी

एकटेपणातही रहावे आनंदी
नवनवीन छंदात जावे रमुनी
चिरतारुण्याचा आनंदलुटूनी
नात्यातील ओलावा ठेवावा जपुनी

जीवन असे फार सुंदर
आहे हेच निसर्गाचे सार
आत्मसात करूनी तयाला
स्विकारावे पानगळतीला

देवावर विश्वास असावा
त्याने निर्मियले सृष्टीला
पानगळती नंतर पुनरपी
निसर्ग ही बहरूनी येई.

नयना पेंढारकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.