Press "Enter" to skip to content

९ फुटांच्या अजगराला मिळाले जीवदान

घराच्या पायरीवर ठाण मांडून बसला होता अजस्त्र अजगर

सिटी बेल | उरण |

रात्री 11.47 वाजता चिरनेर गावातील विजय मुंबईकर यांच्या घराच्या पायरीवर अजगर ठाण मांडूनबसून असल्याचे लक्षात आले.

त्यावर मुंबईकर यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) च्या हेल्पलाईनवर संपर्क साधला. फोन येताचं फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )संस्थेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर हे त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी तो अजगर पकडला व त्याची वनखात्याला कल्पना दिली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी वनखात्यासमक्ष तो अजगर वनपरिक्षेत्रात मुक्त केला. यावेळी म्हात्रे भाऊसाहेब,सनी ढोले,मेजर बोरसे, संतोष इंगोले तसेच फॉन चे जयवंत ठाकूर,सृष्टी ठाकूर व राकेश शिंदे हजर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.