कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाची कमाल
सिटी बेल | प्रतिनिधी | खोपोली |
कामगार क्षेत्रातील ढाण्यावाघ अशी ज्यांची ख्याती आहे, असे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा दबदबा आज खोपोली व रसायनीतील कामगारांना पहायला मिळाला. आज एकाच दिवशी तब्बल ३ ठिकाणी न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे नामफलक अनावरण कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
रसायनी येथील बिर्ला कार्बन तर खोपोली येथिल प्रसोल केमिकल्स व केडल रनवेज होणार या कंपन्यातील कामगारांनी व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून व मनमानी कारभारला कंटाळून महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले. तिनही कंपन्यांतील मुजोर व्यवस्थापन या कामगारांना संघटनेचे नामफलक लावण्यास मज्जाव करत होते परंतू महेंद्रशेठ घरत यांच्या दमदार एन्ट्रीने सर्वाची हवा निघून गेली व कामगारांमध्ये उस्ताह संचारला.

या प्रसंगी आपल्या घणाघाती भाषणात बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले की, या कामगारांवर होणारा अन्याय कदापीही सहन केला जाणार नाही. या मुजोर कंपनी मालक व व्यवस्थापनास वठणीवर आणून कामगारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी यावेळी ठणकावले.
संघटनेने कोवीड काळात मागील दिड वर्षापासून केलेल्या कार्यामुळे संघटनेकडे विविध कंपन्यांतील कामगारांची रांग लागली आहे. कित्येक कंपन्यांचे नामफलक अनावरण करणे बाकी आहे.

या कार्यक्रमासाठी खालापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना म्हात्रे, खालापूर कॉ. क. कार्याध्यक्ष कृष्णा पारंगे, संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील, महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष विनोद म्हात्रे, रा. जि. इंटकचे अध्यक्ष किरीट पाटील, उपाध्यक्ष अमीरभाई खान, उ. ता. इंटकचे अध्यक्ष संजय ठाकूर, प.ता.इंटकचे अध्यक्ष दिपक ठाकूर, म.प्र.युवक कॉ. सचिव निखिल डवले, खोपोली महिला कॉ. अध्यक्षा सौ. रेखाताई जाधव, जेष्ठ नेते अण्णा गावडे, उरण ता. युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, संघटनेचे संघटक योगेश रसाळ, अरुण म्हात्रे, विवेक म्हात्रे, आदित्य घरत, अलंकार पाटील, हरेश पाटील, सुरेश पाटील, देवेंद्र पाटील व सर्व कंपन्यांतील कामगार उपस्थित होते.








Be First to Comment