तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्पुतनिक- व्ही लसीकरणाला सुरुवात
सिटी बेल | नवी मुंबई |
रशियन बनावटीची आणि एकच डोस पुरेसा असेली स्पुतनिक व्ही लस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता नवी मुंबईत उपलब्ध झाली आहे. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर इथे आज ७५ नागरिकांना ही स्पुतनिक व्ही लस देण्यात आली.
आज तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सानपाडा येथे राहणाऱ्या फायना फिलिप या तरुणीला ही लस देऊन या लसीकरणाला सुरुवात झाली. स्पुतनिक व्ही लस घेण्यासाठी आरोग्य सेतूवर नोंद करणे गरजेचे आहे तसेच ९६१९४५४५४५ या नंबरवर फोन करून नाव नोंदवू शकता.
तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर इथे हे लसीकरण सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असे भाकीत अनेक आरोग्य संघटना करीत असून स्पुतनिक व्ही या लसीकडे आपण मोठ्या आशेने पाहत आहोत.
भारतात रशियाची स्पुतनिक व्ही कोरोना लसीचं उत्पन्न डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करीत असून या लशीची किमंत ११४५/- आहे रशियातील शास्त्रज्ञांनी ‘द लान्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लशीच्या संशोधनाबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील दाव्यानुसार, रशियात लशीच्या ज्या सुरुवातीच्या चाचण्या झाल्या, त्यात लशीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत.
चाचणीत सहभागी झालेल्या ज्या ज्या लोकांवर लशीची चाचणी घेण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. विशेष म्हणजे, या चाचणीमुळे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्स सुद्धा झाले नाहीत. असाही दावा रशियन शास्त्रज्ञांनी ‘द लान्सेट’मधील अहवालात केलाय. दोन बिलियन डोस हे पुढील पाच महिन्यांमध्ये भारताला उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी रशियाने या लसीची नोंदणी केली होती म्हणजेच कोरोना विरोधातली जगभरातली ही पहिली लस आहे.








Be First to Comment