सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कोरोना महामारीत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य विषयक कार्य व रक्तदान शिबिरे आशा विविध कार्याने प्रभावित होऊन अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम यांच्या प्रयत्नाने रशीद अक्रम जाफरी व शीरिन नजामउद्दीन शेख यांनी आपल्या कुटूंबियांसहित शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी सर्वाना शिवबंधन बांधून व भगवी शाल अर्पण करून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. या प्रसंगी गटनेते गणेश शिंदे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक अमित भगत, नगरसेवक समीर मुकरी, अतुल ठाकूर व अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम उपस्थित होते.








Be First to Comment