Press "Enter" to skip to content

राज्यातील प्राचीन वृक्षांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रम

शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेची द्रोणागिरी दुर्ग संवर्धन व प्राचीन वृक्ष संरक्षण मोहीम संपन्न

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

राज्याचे वने व पर्यावरण मंत्री व युवा नेते आदित्य ठाकरे यांची महत्वकांक्षी योजना राज्यातील हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रम राबविण्याकरिता आणि महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021 आणलेले आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी तसेच द्रोणागिरी शहर शाखेने द्रोणागिरी गडावर प्राचीन वृक्षांचे जतन व संरक्षण व्हावे या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून मोहीम आखली होती. या मोहिमेत असंख्य शिवसैनिकांनी व नागरीकांनी सहभाग घेतला होता.

सदर मोहीम शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील शिवसेना द्रोणागिरी युवा अधिकारी करण पाटील शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख प्रतीक पाटील व शिवसेना द्रोणागिरी सचिव धनंजय शिंदे व अनेक मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली भल्या पहाटे जय भवानी जय शिवाजी जयघोषात पार पाडली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.