सारडे विकास मंच्याचे कार्याध्यक्ष रोहित पाटील ह्यांची अनोखी संकल्पना
सिटी बेल | सारडे |
सिमेंट,पत्रे,काँक्रीटीकरणा मूल चिमणीला आपल घर बांधण्यास जागाच उरली नाही. मोबाईल टॉवर ,भ्रमण ध्वनी लहरी आश्या अनेक कारणांमुल चिमणी नाहीशी होत चालली आहे आज चिमणी दिसेनाशी झाली आहे.
सारडे गावचे संतोष कृ पाटील यांनी आपल्या वडीलांच्या कै कृ ह पाटील गुरूजी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी समाज कार्य व्हावा याच उदात्त हेतून सारडे विकास मंच ला छोटासा हातभार म्हणून मदत निधी देण्यात आला होता आणि त्या मदतनिधीचा योग्य वापर करण्यात आला. तो म्हणजे आज याच काळजी पोटी सारडे विकास मंच्याचे कार्याध्यक्ष रोहित पाटील ह्याच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि कोमनादेवी ऑक्सिजन पार्क येथे लागवड केलेल्या झाडांच्या वर आज चिमणी आणि छोट्या पक्षाना घरटया ची व्यवस्था करण्यात आली.

संतोष पाटील यांनी दाखविलेल प्रेम आणि त्यातून दिलेली मदत आणि याच मदतीतुन चिमणी पाखरा ना घर देण्याचं काम केले आहे. हे काम करण्यासाठी अनेकांनी आपली कारागिरी दाखविली. त्यात किशोर जयवंत म्हात्रे सारडे , अशोक गणपत पाटील सारडे, प्रिन्स काला केंद्र कळवे तसेच सारडे विकास मंच चे रोशन पाटील (खजिनदार) रोहित पाटील (कार्याध्यक्ष) त्रिजन पाटील, प्रितेश म्हात्रे,कांतीलाल म्हात्रें, स्नेहाताई रोहित पाटील,रुपाली म्हात्रे,रिया स्नेहीत, निल,दानिश,रुद्र,रुंज,श्रीवेद या सर्वांच सहकार्य लाभले.
आपणास सुद्धा आपल्या अंगणात किंवा गैलरित हे घरट लावायचं असल्यास आमच्या सारखे विकास मंचाची संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.








Be First to Comment