सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने, युवासेना प्रमुख महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने, शिवसेना उपनेते माजी केंद्रीय मंत्री भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या सूचनेनुसार प्रदेश अध्यक्ष खालिद मामू यांच्या आदेशानुसार कार्याध्यक्ष ऐहतेशाम पेनवाला यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना अखिल महाराष्ट्र शिव कामगार संघटनेची दक्षिण रायगड मधील पदाधिकाऱ्यांचा पद नियुक्ती कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालय कर्जत येथे संपन्न झाला.
यामध्ये नागोठणे येथील शिवसेनेचा होतकरू क्रियाशील कार्यकर्ता संजय नांगरे यांची शिवसेना अखिल महाराष्ट्र शिव कामगार सेना रोहा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संजय नांगरे यांच्या नियुक्तीमुळे नागोठणे शहर व विभागातून नांगरे यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दक्षिण रायगड च्या विविध नियुक्तीमध्ये जिल्हा समनव्यकपदी विशाल दोषी, जिल्हाप्रमुखपदी सचिन गायकवाड, जिल्हा चिटणीसपदी उदय उभारे,
उपजिल्हाप्रमुखपदी विजय जाधव, महाड तालुका प्रमुखपदी महेश म्हस्के यांची निवड करण्यात आली. दरम्यान प्रदेश अध्यक्ष खालिद मामू आणि प्रदेश कार्याध्यक्ष ऐहतेशाम पेनवाला यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.








Be First to Comment