दीव्यांग बांधवांनी वर्गणी काढून निराधार मुलीला केली आर्थिक मदत
सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे |
कोरोना काळात सर्व दीव्यांग व्यक्ती त्रस्त असताना जसखार गावाचे ग्रामसेवक राजेंद्र सात्संगे यांनी दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून आलेल्या 5% निधीचे वाटप केले. जसखार गावात सध्या एकूण 12 दिव्यांग व्यक्ती असून प्रत्येकाला अंदाजे 13,500/- रुपये निधी मिळाला. हा निधी मिळाल्याने सर्व दिव्यांग बांधावा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व दिव्यांग बाधवांनी आपल्याला मिळालेल्या रकमेतून प्रत्येकी 500/- वर्गणी काढून जसखार गावातील मानसी प्रकाश ठाकूर या निराधार मुलीला दहा हजार रुपये दिले. निराधार मुलीला आर्थिक मदत केली.
जसखार गावातील या अपंग बांधवांचे सर्वत्र कौतुक होत असून एक नवा आदर्श या अपंग बांधवानी निर्माण केला आहे.स्वतः ला मिळालेल्या निधीतून निराधार मुलीला मदत करण्याची घटना प्रथमच घडली आहे.त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमास जसखार गावाचे उपसरपंच शैलेश ठाकूर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक-राजेंद्र सात्संगे , उरण तालुका दिव्यांग प्रतिनिधी महेंद्र म्हात्रे, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर आदी उपस्थित होते. समीर ठाकूर अपंग प्रतिनिधी जसखार यांनी सर्वांचे आभार मानले.








Be First to Comment