Press "Enter" to skip to content

विकास कडू आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

दि. 5/7/2021 सोमवार रोजी ज्ञानदीप जीवन समाज प्रतिष्ठान, कल्याण डोंबिवली तर्फे उरणचे सुपुत्र विकास कडू यांना आदिवासी मित्र पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार श्री विकास कडू यांना चाईल्ड केअर सामाजीक संस्थे च्या माध्यमातून अनेक वर्ष आदिवासी वाड्यात अन्न धान्य, जीवन आवश्यक वस्तू, मास, सॅनिटायझर, कपडे औषधे, वाटप करत आले आहेत तसेच एडस जनजागृती, कोरोना जनजागृती, वृक्षरोपण आशा प्रकारे अनेक उपक्रम आदिवासी अतिशय दुर्लभ डोंगराळ भागात समाज सेवा करत आले आहेत. त्या समाज सेवेची पोच पावती म्हणून श्री विकास कडू यांना मुंबई इंटक अध्यक्ष श्री अजय कापरे यांच्या शुभ हस्ते आदिवासी मित्र हा पुरस्कार देण्यात आला.

सदर कार्यक्रम महाराष्ट्रा सरकारच्या नियमानुसार कोविड च्या नियमावलीत म्हणजे जास्त गर्दी न करता सुरक्षित अंतर पाळून करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला मुंबई इंटक अध्यक्ष अजय कापरे, पनवेल चे उद्योजक निलेश चौधरी ज्ञानदीप जीवन समाज संस्थेचे उपाध्यक्ष दिगंबर जोशी, सचिव आत्माराम कांबळे सदस्य दिलीप राहणे, आदिवासी महाराष्ट्रा संघाचे सचिव दामू कातकरी आदिवासी कल्याण डोंबावली चे अध्यक्ष जनार्दन दामले चाईल्ड केअर सामाजीक संस्थे चे कार्याध्यक्ष विक्रांत कडू आणी सभासद हजार होते.

अजय कापरे यांनी पुरस्कार विजेते श्री विकास कडू यांच्या समाज सेवे बद्दल खूप कौतुक केले आणी भविष्यात विकास कडू चाईल्ड केअर सामाजीक संस्था हि राज्यात नावारूपात नेतील ह्याची मला खात्री आहे हे आपल्या भाषणात म्हणाले.

ज्ञानदीप जीवन समाज प्रतिष्ठान, कल्याण डोंबिवली चे उपाध्यक्ष दिगंबर जोशी हे आपल्या भाषणात म्हणाले की, आम्हाला विकास कडू (उरण )यांना हा पुरस्कार देताना खूप आनंद होत आहे कारण त्यांचे आदिवासी भागात कार्य खूप मोलाचे आहे.

कार्यक्रमाची प्रस्थावना दिगंबर जोशी यांनी केली तर आभार प्रदर्शन जनार्दन दामले यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.