सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
शिवसेना जसखार शाखे तर्फे श्री रतनेश्वरी मंदिराच्या सभागृहात विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जेष्ठ नागरिकांना व महिला भगिनींना छत्री वाटप, योगा व व्यायाम करणाऱ्या महिला भगिनींना योगासनांचे आवश्यक साहित्य वाटप, व्यायाम शाळेला इलोट्रॉनिक इन्व्हर्टर भेट देणे व कॉविड-१९ बाबत जनजागृती करणे आशा विविध सामाजीक कार्यक्रमाचे समाविष्ट करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी जिल्हाप्रमुख तथा जे एन पी टी विश्वस्त दिनेश पाटील, विभागप्रमुख मधुकरशेठ ठाकूर, उपविभागप्रमुख रवीशेठ ठाकूर, माजी सरपंच सौ काशीबाई ठाकूर, रमाकांत म्हात्रे, उपसरपंच शैलेश ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकूर, परेश ठाकूर, जयवंत घरत, सौ प्रतीक्षा ठाकूर , जेष्ठ शिवसैनिक प्रमोद म्हात्रे, किशोर ठाकूर, जेष्ठ नागरिक, महिला भगिनीं व शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख राकेश तांडेल, उपशाखाप्रमुख देवानंद घरत, प्रशांत ठाकूर व जसखार शिवसेना शाखेच्या शिवसैनिक यांनी केले होते.











Be First to Comment