Press "Enter" to skip to content

आगीत घर भस्मसात झालेल्या कुटुंबाला केळवणेच्या तरूणांनी दिला मदतीचा हात

सिटी बेल | अजय शिवकर | केळवणे |

केळवणे येथे गेल्या आठवड्यात २५ जुन गुरूवारी रात्री १२ वाजता हरिभाऊ शंकर ठाकुर यांच्या घराला अचानक आग लागली. हरिभाऊ मच्छिमार बोटीवर काम करत असल्यामुळे ते घरात नव्हते‌. त्यांच्या पत्नीचेही ३ वर्षापूर्वी निधन झाल्याने त्यांच्या दोन्ही मुली रात्री भीती वाटते म्हणून मामाच्या घरी झोपायला गेल्या होत्या. त्यामुळे घरात कुणीही नव्हते.

घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांना माहीत होताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी आवाज दिला. त्यावेळी गावातील तरूण वर्गांनी पाणी कमेटीच्या साहाय्याने पाणी चालू करून दोन मोटर लावून आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु तो पर्यत हरिभाऊ यांचे घर पूर्णतः जळून खाक झाले होते .

या आगीत त्यांच्या घरातील कपडे, भांडी ,धान्य ,सामान यांचा लवलेशही उरला नाही , त्यांचा संसार अगदी रस्त्यावर आल्यामुळे त्यांनी अशावेळी शासनाकडे काहीतरी मदत व्हावी म्हणून याचना केली आहे.

शासकीय मदत होईल तेव्हा होईल याची वाट न बघता गावातील जुनीआळीतील काही युवा वर्ग ग्रामपंचायत सदस्य सुशिल हिराजी ठाकूर ,संदीप भोईर (गुरुजी), भगवान पाटील, डी के पाटील, रामचंद्र म्हात्रे,प्रदीप पाटील राजन पाटील, विश्वजित पाटील, प्रणय पाटील व इतर एकत्र येऊन व सर्वां मिळून ३४१०० धनादेश जमा करून पिडित कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून जमा केला. तसेच गावातील काही लोकांनी एक हात मदतीचा म्हणून वाट्सअप गृप बनवून २० हजार सचिन ठाकुर यांच्या हस्ते देऊ केले असे समजते .

त्याचप्रमाणे आमदार महेश बालदी यांच्या कडून १५ हजाराची मदत सुशिल ठाकूर (केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष ) भानुदास गावंड ग्रा प.सदस्य ,रामचंद्र शिवकर ,ग्रा प सदस्य ,उपसरपंच रश्मी गावंड ,सीता ठाकूर ग्रा प सदस्य, शर्मिला माळी ग्रा प सदस्य ,पांडुरंग म्हात्रे ग्रा प सदस्य मुक्ताबाई माळी ग्रा प सदस्य , सदस्य, रामचंद्र मोकळ शाखा प्रमुख,राजेंद्र ठाकूर ग्रा प सदस्य ,उज्वला ठाकूर ग्रा प सदस्य जे डी थळी रवींद्र माळी, हरिशचंद्र माली, लक्ष्मण माळी, उत्तम पाटील, मंगेश पाटील, पांडुरंग पाटील, सागर ठाकूर, कृष्णा म्हात्रे, तेजस माळी, के जि पाटील, कमलाकर ठाकूर प्रभाकर ठाकूर ,हिराजी ठाकूर दत्ता शिवकर, अनंत गावंड यांच्या हस्ते देऊ केली.

अशा बिकट प्रसंगी मदतीसाठी धावून आलेल्या सर्व लोकांचे हरिभाऊ शंकर ठाकुर यांनी आभार मानले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.