Press "Enter" to skip to content

सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कसाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सिडकोने नोटीस देवून बोलाविलेल्या चर्चेसाठी न जाण्याचा एक मताने निर्णय

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

सिडकोने उरण तालुक्यातील बेलोंडेखार परिसरातील आठ गावातील ७५० एकर जमिनी लॉजिस्टिक पार्कसाठी संपादित करण्याचा घाट सिडकोने घातला आहे. सिडकोच्या या भूमिकेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना आहे.

सिडकोने एमआरटीपी ॲक्ट नुसार अधिसूचित केल्या आहेत. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी सहमती द्यावी यासाठी सिडकोने एकतर्फी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याच बरोबर कोणताही करार मदार न करता सूनवण्या ठेवल्या आहेत. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या भूमिपुत्रांना कोणताही भरीव आर्थिक मोबदला मिळणार नाही, तसेच या योजनेत सहभागी होणाऱ्या भूमिपुत्रांना न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही तसेच कोणताही रोजगाराचा हक्क सांगता येणार नाही असा जाचक करारनामा नितिभ्रष्ट सिडकोच्या सोबत करावा लागणार आहे.

भारतीय राज्य घटनेने आम्हाला दिलेल्या अधिकारावर बेकायदेशीररित्या गदा आणण्याचा प्रयत्न सिडको मार्फत करण्यात येत आहे. सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कमुळे येथील भूमिपुत्रांना आपल्या गावाचा त्याग करावा लागणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत भूमिपुत्रांची आज जी अवस्था झाली आहे तशी अवस्था या आठ गावातील बांधवांची होणार असल्याने या प्रकल्पास तीव्र विरोध होत आहे.

सिडकोने विविध प्रकल्पाच्या माध्यमातून गेली ५० वर्ष प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. म्हणून आम्हाला जमीन विकून,आमची फसवणूक करून घ्यायची नाही हा निर्धार शेतकऱ्यांनी आहे.

या प्रकल्पास हद्दपार करण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी जांभूळपाडा येथे कोविड १९ नियमांचे पालन करून ॲड. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सिडको मार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पास जमीन न देण्याची एकमुखी घोषणा ॲड. सुरेश ठाकूर यांनी उपस्थित भूमिपुत्रांना समोर जाहिररित्या मांडली असून सर्वांनी त्यास संमती दिली आहे. तसेच या प्रकल्पा विरोधात लवकरच आंदोलन सुरू करण्यात येईल अशी घोषणा ॲड. सुरेश ठाकूर यांनी केली

सिडकोस जर हा प्रकल्प अत्यावशक असल्यास त्यांनी शेतकऱ्यांचा सुपीक जमिनी न घेता. रिलायन्स सेझ साठी संपादित व वीस वर्षे पडीक असलेली जमीन ताब्यात घ्यावी असे सुधाकर पाटील यांनी भूमिका मांडली. या सभेस उपस्थित संतोष पवार, संजय ठाकूर, रमाकांत पाटील, गुरुनाथ पाटील, रमण कासकर, रुपेश पाटील, राज पाटील, रा. बा. म्हात्रे, पी. सी. मढवी, चंद्रकांत मढवी सर, प्रा. राजेंद्र मढवी, ॲड. मनोज म्हात्रे, सरपंच मुंबईकर, पंकज ठाकूर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.