Press "Enter" to skip to content

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या
जिल्हाध्यक्षपदी विरेश मोडखरकर

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |

उरण मधील पत्रकार विरेश मोडखरकर यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचामान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी देशाला आज नितांत गरज आहे, ती म्हणजे आचार, विचार आणि कृतीने भ्रष्टाचार मुक्त करण्याची. क्षेत्र कोणतेही असो आज भ्रष्टाचाराने पोखरलेले असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये निकृष्ट दर्जा पाहायला मिळतो आज याचे दुष्परिणाम कानाकोपर्‍यात रहाणार्‍या जनतेपर्यंत पहावयास सुरुवात झाली आहे. हे सोडविण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने विरेश मोडखरकर यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी सोपविली आहे. ते नक्कीच भ्रष्टाचार उघड करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास ही संतोष पवार यांनी व्यक्त करीत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष विरेश मोडखरकर यांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीत भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असे सत्काराला उत्तर देताना सांगितले.

उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष संजीव म्हात्रे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की तुम्हाला भेट देण्यात आलेला सोनचाफा झाडाची फुले ही कुठेही कोनात ठेवली तरी त्याचा सुगंध आजूबाजूच्या परिसराला देत असतो त्याप्रमाणे विरेश तुमच्या कार्याचा सुगंध दरवळत राहो असा विश्वास व्यक्त केला.

उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. संजीव म्हात्रे, मनसेचे नेते संदेशभाई ठाकूर, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, सौ. अनघा ठाकूर व इतर यांच्या हस्ते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विरेश मोडखरकर यांचा शाल व चोहोकडे सुगंध देणारे सोनचाफ्याचे झाड देऊन सन्मानित करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.