Press "Enter" to skip to content

तहसील कार्यालय खालापूर येथे डेल्टा प्लस विषाणू जागृती आणि मार्गदर्शन

डेल्टा प्लस रोखण्यासाठी एस एम एस चे पालन करा – डॉक्टर रणजीत खंदारे

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेला डेल्टा प्लस विषाणूचा मुकाबला करायचा असेल तर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन या एस एम एस चे पालन करा असे लोधिवली अंबानी रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर रणजित खंदारे यांनी सांगितले. तहसील कार्यालय खालापूर येथे डेल्टा प्लस विषाणू जागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमात डॉक्टर रणजित खंदारे बोलत होते.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत खालापूर तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण सापडले तसेच मृत्यूचे देखील प्रमाण वाढले होते .सध्या दुसऱ्याला लाटेचा प्रभाव ओसरला असला तरी डेल्टा प्लस या नवीन विषाणू ने आरोग्य विभागा बरोबर सर्वसामान्यांची देखील चिंता वाढवली आहे. या नवीन विषाणूच्या संदर्भात सर्वसामान्यांना माहिती व्हावी त्यांच्या मनातील भीती कमी व्हावी यासाठी तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी डेल्टा प्लस विषाणू बाबत घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले होते. तालुक्यातील सर्वात प्रथम कोव्हिड रुग्णालय असणारे लोधीवली येथील अंबानी रुग्णालयाचे अनुभवी डॉक्टर रणजीत खंदारे यांना मार्गदर्शनासाठी बोलवले होते.

अंबानी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले होते .डॉक्टर रणजित खंदारे यांनी मार्गदर्शन करताना सोप्या भाषेत एस एम एस म्हणजेच सॅनिटाइजर ,मास्क, आणि सोशल डिस्टन याचे पालन करा असे सांगितले. या मार्गदर्शनाचा लाभ तालुक्यातील शिक्षक तसेच कर्मचारी यांनी घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.