Press "Enter" to skip to content

डॉक्टरांच्यामुळे अनेकांनी केली मृत्यूवर मात – तहसीलदार चप्पलवार

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

खालापूर तालुक्यातील डॉक्टरांच्यामुळे कोरोना महामारीच्या काळात मृत्यूवर अनेकांनी विजय मिळवला आहे,असे उदगार तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी काढले.

डॉक्टर डे निमित्ताने खालापूर तालुक्यातील सर्व शासकीय सेवेतील डॉक्टरांचा सन्मान खालापूर तहसील कार्यालयाच्यावतीने तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी केला.त्याप्रसंगी ते बोलत होते,ते पुढे म्हणाले कोरोनाच्या सर्वच काळात मी डॉक्टर करीत असलेले काम अतिशय जवळून बघितले आहे,स्वतःचे घर-परिवार,तहान-भूक विसरून त्यांनी काम करून अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणले आहे.डॉक्टर हे देवाचे दुसरे रूप आहे.आम्ही आमचे कर्तव्ये करीत असून त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागला तरी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देऊ,असे सर्व डॉक्टर यांच्यावतीने डॉ. अनिलकुमार शहा यांनी सांगितले.तर आपण वर्षभरात घरीच गेलो नसल्याचे डॉक्टर यांनी सांगितले.खालापूर तालुक्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी अनेक रोगी दाखल होत असल्याने येथे चांगली सेवा मिळते असे अनेकांनी आवर्जून सांगितले.

खालापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रोकडे,डॉ. संयोगीता खेरडेकर,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.डॉक्टर डे हा तालुक्यात प्रथमच साजरा झाल्याचे अनेकांनी सांगून तहसीलदार यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.