युनियन नामफलकाचे अनावरण
सिटी बेल | श्रीवर्धन | राकेश खराडे |
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या राष्ट्रीय ट्रेड युनियनची शाखा श्रीवर्धन नगरपालिकेतील 35 सफाई कर्मचाऱ्यांची युनियन मोठ्या उत्साहाने गठित करण्यात आली.या युनियन नामफलकाचे अनावरण कामगारनेते संतोषभाई घरत यांच्याहस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ही देशातील एकमेव बहुजन समाजाची ट्रेड यूनियन असून केवळ बहुजनांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी लढणारी देशातील एकमेव संघटना आहे. गेले अनेक दिवस लॉक डाऊनच्या काळात श्रीवर्धन येथील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळत नव्हता.यासाठी त्यांना बामसेफ या आंतरराष्ट्रीय संघटनेची राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या युनियनसोबत बैठक घेऊन त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन बी कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली व कामगारनेते संतोषभाई घरत, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य गणेश पाटील रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत युनिट गठीक करण्यात आली. याप्रसंगी दक्षिण रायगडमधून बामसेफ व बामसेफच्या इतर शाखा यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीवर्धन नगरपालिकेतील सर्व 35 सफाईं कर्मचाऱ्यांनी आरएम बिकेऐसचे नेतृत्व स्वीकारले.
याप्रसंगी आरएम बिकेएस संघटनेच्या नामफलकाचे अनावरण कामगारनेते संतोषभाई घरत यांच्याहस्ते झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व नगराध्यक्ष नगरपालिका श्रीवर्धन यांची भेट घेऊन या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या संविधानिक हक्क अधिकार मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा किंबहुना ते त्यांचे हक्क त्यांना मिळालेच पाहिजे यासाठी संघटनेच्यावतीने चर्चा करण्यात आली.

यावेळी समाजातील सर्व कामगारवर्ग जो बहुजन अर्थात एस सी एस टी ओ बी सी मुस्लिम मराठा या वर्गातून मोठ्या प्रमाणात हजर होता.नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आमचा श्रीवर्धन युनिटचा जाहीर पाठिंबा आहे. असे असे घोषित करण्यात आले.
आमच्यासाठी हा दिवस आनंदाचा असून येणाऱ्या काळात आम्ही एकजुटीने राहून आमची लढाई लढणार आहोत असे संघटनेचे अध्यक्ष चिमण यांनी सांगितले.
यावेळी एन.बि.कुरणे (राष्ट्रीय महासचिव ) , कामगारनेते संतोषभाई घरत (राज्य उपाध्यक्ष ) ,गणेश पाटील (जिल्हाध्यक्ष ) तसेच धनंजय पवार (राज्य कोषाध्यक्ष प्रोटान), दिपक मोरे (RMBKS) निमंत्रक कोकण विभाग 2),सुर्यकांत कासेसर(जिल्हा कार्यध्यक्ष प्रोटान), मिलिंद साळवी (राज्य उपाध्यक्ष नफ), बि के एमचे राकेश मोरे ,महेश जाधव,राहुल गायकवाड RMBKS, अनिल मोरे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. RMBKS श्रीवर्धन युनिटचे अध्यक्ष चिमण (अध्यक्ष) व सर्व कामगार सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.








Be First to Comment