जिल्ह्यातील फाईंव्हस्टार आरोग्य केंद्र म्हणून लोहोपची नोंद होईल : पालकमंत्री आदिती तटकरे
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लोहोप आरोग्य केंद्र हे रायगड जिल्ह्यातील फाईंव्हस्टार आरोग्य केंद्र म्हणून नोंद होईल असे प्रतिपादन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले.लोहोप येथे सर्व सोयी सुविधांनी युक्त असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले असून त्याचे उदघाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी त्या बोलत होत्या.रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून खालापूरला सर्व सोयींनी सुसज्ज रुग्णालय उभारणार असल्याची ग्वाही आदितीताईंनी दिली.
आज अतिशय आनंदाचा दिवस असल्याचे सांगत जिल्हा परिषदेची अध्यक्ष म्हणून काम करताना या रुग्णालयाचा प्रश्न कायम यायचा. लोहोप प्राथमिक केंद्रासाठी महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांच्या मेहनतीने हे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लवकरच साकारल्याचे पालकमंत्री म्हणाल्या.जागेमुळे काम रखडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासकीय जागा उपलब्ध करून देणार असून प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असल्याचे स्पष्ट करत लोहोपमध्ये लसीकरण केंद्र सुरू करा अशी सूचना त्यांनी केली.
कोरोना महामारीत आरोग्य यंत्रणा मजबुत करण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केल्याचं सांगत खासदार श्रीरंग बारणे यांनी आरोग्य व्यवस्थेवर सध्या भर दिला जात असल्याचं स्पष्ट करत जिल्ह्यातही चांगलं काम सुरू असून पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचं यावेळी कौतुक केलं.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, मुख्याधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, मोतीराम ठोंबरे, पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये, माजी सरपंच संदीप मुंढे, डॉ. सुधाकर मोरे, सरपंच पल्लवी देवघरे, उपसरपंच अनंत पाटील, डॉ. प्रसाद रोकडे, डॉ.किरण पवार, डॉ.सीमा पाईकराव, आरोग्यसेवक आय.पी.पानगे,वर्षां पाटील, विनायक गायकवाड,बारक्या घरत, शिवदास जगताप, सुनील थोरवे यांच्यासह आरोग्य यंत्रणा,मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमाचे दोन दिवस अगोदर पासून व्यवस्थितरित्या नियोजन माजी सरपंच संदिप मुंढे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष चौधरी यांनी पाहिले तर आभारप्रदर्शन कैलास म्हात्रे यांनी केले.








Be First to Comment