Press "Enter" to skip to content

नरेश म्हात्रे सेवानिवृत्त

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण येथील बिपीसीएल या राष्ट्रीय कंपनीतील कामगार, महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तथा रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले नरेश म्हात्रे हे BPCL कंपनीतून सेवानिवृत्त झाले. त्यांनी कंपनीत अखंडीत सलग 30 वर्षे एकनिष्ठेने,प्रामाणिपणे काम केले.त्यामुळे त्यांचा कंपनीचे इन्चार्ज एच आर शुक्ला, टेरेटरी मॅनेजर -संथील साहेब, सेफ्टी ऑफिसर -संजय कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


नरेश म्हात्रे यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, पर्यावरण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.अनेक गरजू मुलांना ते नेहमी मोफत वही, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात.उरण चारफाटा येथील झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी बाल संस्कार केंद्र काढून त्याचा सर्व खर्च स्वतः करत गोरगरीबांना ते शिक्षण देत आहेत. अश्या सेवाव्रती व्यक्तिमत्वाचा सेवानिवृत्त उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.