Press "Enter" to skip to content

रोटी घर च्या माध्यमातून गोरगरीबांना पोटभर जेवण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण मधील गोरगरीबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी सेव अवर बीचचे अमोल दुरुगकर, स्वाती दुरुगकर,भूमिका सिंग हे प्रयत्नशील होते. खुशिया फॉउंडेशचे अध्यक्ष चिनू क्वात्रा हे उरण पिरवाडी बिचवर साफसफाई करण्यासाठी आले असता अमोल दुरुगकर, स्वाती दुरुगकर, भूमिका सिंग, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी उरण मध्ये गरीब कुटुंबातील लहान बालकांना मोफत जेवण मिळावे अशी संकल्पना त्यांच्यासमोर मांडली. लगेच त्यांनी या संकल्पनेला होकार दिला. आज ही संकल्पना उरण मध्ये प्रत्यक्षात उतरली आहे.

गरीब व गरजू मुलांना पोटभर जेवण मिळावे या दृष्टीकोणातून उरण शहरात गरीब मुलांना दररोज अन्नदान केले जात आहे.सेव अवर बीच,वुमन ऑफ विसडम च्या सदस्या कु. भूमिका सिंग आणि मुंबईचे समाजसेवक चिनू क्वात्रा यांच्या खुशियाँ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये “रोटी घर ” ही संकल्पना जुलै महिन्यापासून सुरु झाली आहे .

यामध्ये गरीब मुलांना मोफत जेवण दिले जाते . रोटी घर या संकल्पनेची सुरुवात दि 1 जुलै 2021पासून सुरु झाली आहे तरी यामध्ये जेवण वाढण्यासाठी आणि जेवण पोहचविण्यास काही स्वयंसेवकांची मदतीची गरज आहे.तरी कोणाला मनापासून, स्व ईच्छेने मदत करायची असल्यास त्यांनी भूमिका सिंग फोन नंबर 9867577669 वर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.