कामगार नेते महेंद्र घरत यांची प्रमुख उपस्थिती
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण काँग्रेसने आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधत उरण मधील डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या काळात उरणमधील डॉक्टरांनी जीवावर उदार होऊन उरणकरांना सेवा दिली आहे व यापुढेही देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल उरण काँग्रेसने घेत आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून उरणमधील डॉक्टरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

काँग्रेसचे जेष्ठ नेते महेंद्र घरत यांनी या सत्कार सोहळ्यात उरणमधील डॉक्टरांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता येथील जनतेची सेवा केली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणे उचित होते. ते काम उरण काँग्रेस कमिटीने करून दाखविले.
त्यांच्या बरोबरीने मी व माझे सहकारी यांनी अनेक गरजूंना अन्नधान्य पुरविण्याचे कार्य केले असल्याचे महेंद्र घरत यांनी सांगितले. जगात डॉक्टर व शिक्षकांना दैवत मानले जात असल्याचे सांगत यापुढे दरवर्षी डॉक्टर दिनी उरण काँग्रेसतर्फे डॉक्टरांचा सत्कार करण्यात येईल असा विश्वासही घरत यांनी व्यक्त केला.
यावेळी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे व उरण तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. विकास मोरे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घन:श्याम पाटील, डॉ. अजय कोळी, डॉ.
याप्रसंगी महेंद्र ठाकूर, मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, भालचंद्र घरत, यशवंत म्हात्रे, कमलाकर घरत, श्रेयस घरत, गणेश पाटील, उमेश भोईर, संजय ठाकूर, अकलाख शिलोत्री, गोपीनाथ मांडलेकर, अशोक ठाकूर, गुफरान तुंगरकर, सदानंद पाटील, रेखा घरत, अफशा मुकरी, निर्मला पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment