Press "Enter" to skip to content

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने ‘डॉक्टर डे’ चे औचित्य साधून नानामास्तर नगर मधील नागरिकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दीडशे जणांनी आपली तपासणी करून घेतली.

येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सभागृहात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष सदाशिव बैलमारे यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा सचिव प्रितेश बोंबे, डॉ. वर्षा बोंबे, दीपक कदम, अमित कासरुंग आदी उपस्थित होते.

या शिबिरात नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, ई सी जी तपासणी रक्तदाब तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.