Press "Enter" to skip to content

उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेची मागणी

लोकनेते दि.बा.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला जेएनपीटी चा CSR फंड मिळावा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्रांना विविध उच्च शिक्षणासाठी उरण तालुक्या बाहेर जाऊन वर्षानुवर्षे शिक्षण घ्यावे लागत आहे.अनेक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था पनवेल, वाशी, नवी मुंबई, मुंबई परिसरात आहेत मात्र उरण मध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत त्यामुळे उरण तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्रांना उरण तालुक्यातच दर्जेदार व उत्तम शिक्षण मिळावे, उरण तालुक्यातील विद्यार्थ्यांचे श्रम, वेळ व पैशांची बचत व्हावी या दृष्टीकोणातुन उरण तालुक्यातच शैक्षणिक सेवा सुविधा पुरविण्याचा उरण तालुक्यातील ‘उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था’ या संस्थेचा उद्देश असून या संदर्भात संस्थेने JNPT प्रशासनाकडे लोकनेते दि.बा.पाटील इंजिनिअररिंग कॉलेज उरण साठी CSR फंडाची मागणी केली होती.

उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेने केलेल्या मागणीमुळे लोकनेते दिबा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या CSR फंड संदर्भात जेएनपीटीने बैठक बोलावली होती त्या बैठकीत उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था उरणचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीला सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी, जे. पी म्हात्रे, जगजीवन भोईर उपस्थित होते. जेएनपीटी व्यवस्थापनाने उरण तालुक्यात होत असलेल्या दि.बा.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या CSR फंड संदर्भात चर्चा केली यावेळी तुम्हाला किती फंड हवा आहे असा JNPT प्रशासनाने संस्थेला विचारला असता संस्थेने 50 कोटी पाहिजे असल्याचे सांगितले.त्यावर JNPT व्यवस्थापनाने सांगितले कि आमचा या वर्षीचा फंड फक्त 6 कोटी आहे. त्यावर संस्थेने सांगितले की तुम्ही या वर्षी जास्तीत जास्त CSR फंडाची तरतुद करा जेणेकरून कामाला सुरुवात करता येईल आणि दरवर्षी प्राधान्याने CSR फंड ची तरतूद करा जेणेकरून 40 % बांधकाम झाल्यास तंत्रनिकेतन मंडळाची मान्यता मिळेल आणि दिबा पाटील इंजीनियरिंग काॅलेज सुरू होईल.

यावर JNPT व्यवस्थापनाने सांगितले की यासाठी जेएनपीटीचे चेअरमन आणि विश्वस्त भुषण पाटील यांची बैठक बोलावण्यात येईल.या बैठकीमुळे उरण मधील स्थानिक भूमीपुत्रांच्या आशा पल्लवीत झाल्या असून लवकरच उच्च शिक्षण देणाऱ्या सेवा सुविधा उरण तालुक्यात उपलब्ध व्हाव्यात अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.