Press "Enter" to skip to content

मुस्लिम मोहळ्यातील तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण शहरातील मुस्लिम मोहला तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम यांच्या प्रयत्नाने हा प्रवेश सोहळा पार पडला.

प्रवेश करण्यामध्ये अरमान शेख, अरफात मुजावर, अरबाज मुजावर, शाहरुख गादि, अबरार सिलोत्री, सगर, कईस कादरी, मुस्तफा भाटकर, जब्बार सोहेल, कादिर तुंगेकर, सिया, सैल शेख. तुहा शेख, नामाझा काझी, अमीर शेख, दहिव, हमजा कैफ, अबरार शेख, इरफान शेख, आनस मुकरी यांनी आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेना जातीपातीचे राजकारण करत नाही व येथे येणाऱ्या उरण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मुस्लिम समाजाचा योग्य सन्मान करेलतसेच शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनीही मार्गदर्शन करून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.

या प्रसंगी कामगार नेते महादेव घरत, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक के एम घरत, विभागप्रमुख एस के पुरो, अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम व मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.