जीवन
जीवन सरले जीवन उरले किती अनुभवले
जगणे नेहमीच परावलंबी राहिले
जन्मतःच आईने कुशीत कुरवलीले
स्वतःला समजताच प्राप्ती साठी झगडावे लागले
आपले परके कळू लागले
संसारात किती रमलो नाही कळले
स्वार्थासाठी हेवेदावे करून पाहिले
हाव हाव माझं माझं करुनि राहिलो
मन काही तृप्त नाही झाले
संसारी प्रत्येकाला समजून घेतले
पण हाती काही ना उरले
शांती साठी देव धर्म करुनि राहिलो
जीवनात सुख संपन्नता कशात आहे नाही कळले शेवटी देह रुपी जगता जगता निसर्ग सौंदर्य श्रीष्टीचे अलौकिक देणं दृष्टी आड नाही केलं
मग मात्र समाधानात रमलो
कोरोनाने मरण उघड्या डोळा पहिले
आपण म्हणतो ते कधी नसते आपले
मुकुंद इनामदार, नवीन पनवेल







Be First to Comment