सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण तालुक्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखला जाणारे गाव म्हणजे वशेणी गाव. याच गावातील गरीब, गरजू व होतकरू मुलांना शिक्षणासाठी एक हात मदतीचा मिळावा म्हणून वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य आदिनाथ नरेश पाटील यांनी श्री/सौ. आनंदी अर्जुन ठाकूर ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
नुकताच या योजनेचा शुभारंभ झाला. या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी,सातवी आणि दहावी मध्ये शिकणाऱ्या गरीब गरजू व होतकरू मुलांना प्रत्येकी रोख रक्कम १ हजार रूपये व प्रमाणपत्र देण्यात आले.
या योजनेचा फायदा खालील मुलांना मिळाला. कुमारी उन्मेषा मनोज ठाकूर दहावी, कुमार प्रेम प्रल्हाद पाटील दहावी, कुमारी सिध्दी राजेंद्र म्हात्रे पाचवी, कु.यश मच्छिंद्र पाटील सातवी, कुमारी मुस्कान समाधान पाटील सातवी, कु.आयुष्य निवास ठाकूर सातवी यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने केले होते. यावेळी प्रास्ताविकात संपादकीय मंडळाचे कार्यवाहक श्री मच्छिंद्रनाथ म्हात्रे म्हणाले, की वशेणी हा गाव शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखला जातो. अशा या पंढरीत प्रत्येकाने शिका! मोठे व्हा! आणि गावाचे नाव उज्ज्वल करा! ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे नक्कीच पाठबळ मिळेल.असा ही विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिष्यवृत्ती सुरू करणारे आदिनाथ ठाकूर व ज्यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती सुरू केली त्या श्री/सौ आनंदी अर्जून ठाकूर यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य श्री.संदेश गावंड, कैलास पाटील, महेंद्र पाटील, श्री.पुरुषोत्तम पाटील, श्री. सतीश पाटील, डाॅ. रविंद्र गावंड, सौ. आनंदी ठाकूर, अर्जून ठाकूर, श्री. बी.जे.म्हात्रे, श्री. जगन्नाथ म्हात्रे, श्री. अनंत पाटील, श्री. नरेश पाटील, कुमार आदिनाथ पाटील, श्री. विजय पाटील ,श्री. अनंत तांडेल, श्री. गणेश खोत, मिलिंद पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment